आ. थोरात नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री विखेंच्या तालुक्यात

काँग्रेस विधिमंडळ पद व आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये अवकाळी व गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या फळबागा व पिकांची पाहणी केली असून
या अवकाळी पावसाने फळबागांसह पिकांची मोठे नुकसान झाले असल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, अशी आग्रही मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राहाता तालुक्यातील गोगलगाव, पिंपळस, दहेगाव, केलवड, निर्मळ पिंपरी या गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या फळबागा व पिकांची पाहणी आमदार थोरात यांनी केली. यावेळी समवेत शिर्डी विधानसभा काँग्रेस नेते सुरेश थोरात, राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. पंकज लोंढे, डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन सदाफळ, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, मच्छिद्र गुंजाळ आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी राहाता तालुक्यातील या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फळबागा व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, राज्यातील शेतकरी हा मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. फळबागा, भाजीपालासह सर्व पिकांसाठी खते, बी बियाणे यासाठी शेतकर्याला मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. लहान मुलांसारखी पिकांची जोपासन करावी लागते. त्यातच अशा अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कंबरडे मोडले जाते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना वेळेवर मोठी मदत झाली असून सहजतेने मदत उपलब्ध झालेली आहे. या सरकारनेही घोषणा न करता शेतकऱ्यांना जे नुकसान झाले आहे.
त्याकरीता भरीव मदत केलो पाहिजे, अशी मागणी आमदार थोरात यांनी केली. याप्रसंगी राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागा व झालेल्या नुकसानीबाबत आमदार थोरात यांच्या पुढे समस्या मांडल्या. या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार थोरात यांनी सांगितले.