अहमदनगर
कंटेनर-दुचाकीचा अपघात; दुचाकीवरील दोघे ठार

कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील छगन गायकवाड (वय 31 रा. मेहकरी ता. आष्टी जि. बीड) व जयदत्त अनिल जिवे (वय 22 रा. शिरापुर ता. आष्टी जि. बीड) यांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर-जामखेड रोडवरील दशमीगव्हाण (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
छगन व जयदत्त हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना कंटेनर चालकाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत छगन व जयदत्त हे दोघे जखमी झाले होते.
जखमी व्यक्तींना उपचारासाठी अहमदनगर शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारापूर्वीच त्या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक राजेद्र सानप यांनी पथकास घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस अंमलदाकर डी. बी. पालवे करीत आहे.