अहमदनगर

कंटेनर-ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जखमी

अहमदनगर- कोपरगावहुन येवल्याच्या दिशेने जाणारा कंटेनर व येवल्याहून कोपरगावकडे येणारा आयशर ट्रक यांची येसगाव खिर्डीगणेश (ता. कोपरगाव) शिवारालगत समोरासमोर धडक झाली.

 

यात एम.पी 09 जी ई 6274 या वाहनातील चालक ठार झाला असून कंटेनर एच. पी. 72 डी 3136 मधील अशोकसिंग राजपूत व भागसिंग सोहता हे दोघेही जखमी झाले आहे.

 

जखमीना उपचारकरिता दवाखान्यात हलविले असून मयताचा मृतदेह शवविच्छेदाना करिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. सदर अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मदत करून जखमिंना उपचारकरिता रुग्णालय हलविले.

 

यावेळी वाहतूक जाम झाल्याने तालुका पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरळीत केली. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button