बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण; मुंबई महापालिकेनं तिचं घर केलं सील

राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या वेगाने घटतेय. तर मुंबईतील रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून कमी होतेय.
मात्र नुकतंच अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण झाली. मुंबई महानगरपालिकेनं तिचं घर सील केलं असून तिच्या घराचा परिसर हा ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
लारा दत्ताला कोरोनाची लागण झाली आहे. कुटुंबात फक्त लारा दत्ताच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुरुवारी मुंबईत 54 नवे रुग्ण आढळले आणि शुक्रवारी लाराचं घर महापालिकेकडून सील करण्यात आले. नव्याने आढळलेल्या 54 रुग्णांपैकी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचं पहायला मिळतंय. सध्या रुग्णालयात केवळ 27 रुग्ण दाखल आहेत.
दरम्यान नुकतेच लारा दत्ता हिकअप्स अँड हुकअप्स या वेब सीरिजमध्येही दिसली होती. याशिवाय ती ‘हंड्रेड और कौन बनेगी शिखरवती’ मध्येही दिसली होती.
लारा दत्ताने महेश भूपतीसोबत लग्न केले आहे. तिने मिस युनिव्हर्सचा पुरस्कारही जिंकला आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.