बाजारभाव

कापसाची आवक मंदावली; मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- सध्या शेतकर्‍याच्या कापसाला प्रतवारी नुसार 7 हजार 800 ते 8 हजार 100 पर्यंत क्विंटल मागे भाव मिळत आहे. मात्र शेतकर्‍यांना 10 हजार रुपया पर्यंत भाव मिळण्याची आस लागुन राहिल्याने अजुनही शेतकर्‍यांनी त्यांचा कापुस खरेदी केंद्रावर विक्री साठी आणला नसुन तो कापुस साठवुन ठेवला आहे.

 

शेवगाव येथे भारतीय कापुस निगम चे (सी सी आय) कापुस खरेदी केंद्र 16 डिसेंबर पासुन सुरू झाले आहे, मात्र शेतकर्‍याच्या कापसाला दररोजच्या बाजार भावाप्रमाणे बदलता दर मिळत असल्याने अजुनही शेतकर्‍यांकडून केंद्रात कापूस विक्री करण्यास थंड प्रतिसाद मिळत आहे

 

शहरातील रिद्धी सिद्धी व दुर्गा फायबर्स आशा दोन कापुस खरेदी केंद्रावर सीसीआयची खरेदी सुरू असुन बुधवार अखेर 2 हजार 590 क्विंटल कापुस खरेदी झाली असुन शुक्रवारी शेतकर्‍याच्या कापसाला प्रतवारी नुसार 8 हजार ते 8 हजार 100 पर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाल्याची माहिती केंद्र व्यवस्थापक महेश किटकुले यांनी दिली.

 

यंदाच्या हंगामात दोन महिन्यांपासून कापुस खरेदीला तालुक्यात सुरवात झाली असुन शहरातील 6 व तालुक्याच्या ग्रामीण भागातील 2 अशा 8 जिनिंग मिल वरून सध्या कापुस खरेदी सुरु आहे. आज अखेर जवळपास 51 हजार क्विंटल कापुस खरेदी झाली आहे.

 

तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास 43 हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली आहे. पावसाळ्यात पावसातील अनियमित पणा तसेच पावसाळ्याच्या शेवटी काही ठिकाणी झालेली अति वृष्टी व सततच्या पावसामुळे कापुस उत्पादनास मोठा फटका बसल्याने कापसाचे आगार म्हणुन जिल्ह्यात ओळख तयार झालेल्या शेवगाव तालुक्यातील दरवर्षीची कपाशीची होणारी उलाढाल यंदा चांगलीच मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

तरीही कापसाच्या राज्यासह देशातील बाजारपेठेत कापसाची वाढती मागणी लक्षात घेता शेतकर्‍याच्या कापसाला दहा हजारापर्यंत भाव मिळण्याची आस लागुन असल्याने सध्यातरी कापसाची आवक मोठ्या प्रमाणात मंदावल्याचे चित्र तालुक्यातून दिसुन येत आहे.

 

बाजार दर बाजारसमितीने कळवावेत

 

सिसिआय खरेदी केंद्राचा दररोजचा भाव समबंधीत शेतकर्‍यांना कळविण्याची बाजारसमितीने व्यवस्था करून शेतकर्‍यांना त्यांचा कापुस विक्रीसाठी मदत व सहाय्य करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली असुन या बाबतचे निवेदनही त्यांनी बाजार समिती सह सर्व संबंधितांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button