Cotton Market Price : जूनमध्ये पहिल्यांदाच कापसाचा भाव कोलमडला! आता पुढे काय?

Cotton Market Price :- मित्रांनो सध्याला महाराष्ट्रामध्ये तसेच देशात अनेक ठिकाणी कापसाचे भाव दबावात दिसत आहेत. दरवर्षी जून मध्ये कापसाचे भाव सर्वाधिक असतात, परंतु इतक्या वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये कापूस दबावत आला आहे. कापसाच्या भावांमध्ये नरमाई दिसून येत आहे, सरकारने कापसासाठी हमीभाव जाहीर केला तरी पण भावामध्ये सुधारणा होताना दिसत नाही.
दरवर्षीच्या रेकॉर्डनुसार पहिले तर डिसेंबर पेक्षा जूनमध्ये कापसाचे भाव सर्वाधिक असतात. परंतु यंदा डिसेंबर पेक्षा जून मध्ये कापसाचे भाव खूप कमी झाले आहेत. आता पेरणी चे हंगाम देखील जवळ आले आहेत, तेव्हा मग आता कापूस दरात केव्हा सुधारणा होतील. असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना लागून आहे. कापसाचे भाव वाढतील या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्री केला नाही. परंतु आता मागील महिन्यापासून पडत असलेले भाव पाहता शेतकरी हवालदिल झाला आहे.
सुरुवातीला कापसाचे भाव हे ₹9000, ₹10000, ₹11000 पर्यंत पोहोचले होते. तेव्हा शेतकऱ्यांना अजून भाव वाढ होण्याची अपेक्षा होती. भाव वाढीच्या अपेक्षेमुळे आता शेतकऱ्यांना कापूस हा खूप कमी भावामध्ये विक्री करावा लागतोय. दरवर्षी यावेळी कापसाला सर्वाधिक भाव असतो, परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी लवकर कापूस विक्री केला नसल्यामुळे कापसाचे भाव नरमले आहेत.
कापसाचे दर केव्हा सुधारणार? भाव वाढ केव्हा होणार.
बाजारामध्ये सध्या कापसाची आवक वाढली आहे. यामुळे काही कालावधीनंतर कापसाचे भाव, सुधारण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी वर्तवली आहे. सध्या भाव कमी असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्री केले नव्हते. ते सर्व शेतकरी भाव अजून कमी होतील, या भीतीने मोठ्या प्रमाणात कापूस विक्री करत आहेत. यामुळे काही कालावधीनंतर बाजारात कापसाची आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे भाव हे पूर्ववत होऊन, त्याच्यामध्ये सुधारणा देखील आढळू शकते.
केंद्र सरकार कापूस हमीभाव वाढ
कापसाचे कमी झालेले भाव लक्षात घेता, केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी कापसाच्या हमीभावात 9 टक्क्यांची वाढ केली आहे. याचा उद्देश कापसाचे पडलेले भाव सुधारणे आहे, सध्या हमीभावात लांब धाग्याच्या कापसासाठी केंद्र सरकार कडून 7 हजार 20 रुपये हमीभाव दिला जात आहे. हमीभावाच्या पातळी दरम्यानच सध्या कापसाचे भाव आहेत.
कापूस सध्याचा बाजारभाव
सध्या बाजारामध्ये कापसाला हमीभावाच्या सरासरी ₹7000 ते ₹7500 यादरम्यान भाव मिळत आहे. मागील आठवड्यामध्ये कापसाच्या दरामध्ये चांगली वाढ दिसून आली होती, परंतु आता कापसाचे भाव नरमले असून बाजार भाव हा ₹200 रुपयांनी कमी झाला आहे.
कापूस बाजार भाव पडण्याचे कारण सांगण्यात येत आहे, यामध्ये मुख्य स्वरूपात CAI, CCI आणि COCPC यांनी कापूस गाठींचा अंदाज केंद्रित आहे. कारण प्रत्येक संस्थेने कापूस गटाचे उत्पादन किती होणार याचा अंदाज सांगितला आहे. पण सर्वांच्या अंदाजाने मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे, सध्या अजून मोठ्या प्रमाणात कापूस यायचा बाकी आहे. असा या संस्थांचा अंदाज आहे त्यामुळे कापसाचे भाव हे सध्याला नीच्यांकी पातळीवर आले आहेत.
CAI चे कापूस गाठी उत्पादन अंदाज – 298 लाख गाठी
CCI आणि COCPC कापूस गाठी उत्पादन अंदाज – 343 लाख गाठी
तफावत – 45 लाख कापूस गाठी
कापसाच्या गेल्या हंगामात मार्च महिन्यानंतर कापसाला भाव दहा ते बारा हजारांवर आला होता. यामुळे हंगामाच्या शेवटी कापसाचे बाजार भाव हे अजून वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कापूस मागे ठेवला, पण यंदा कापसाच्या शेवटच्या हंगामात कापसाला बाजार भाव हा नीचांकी पातळीचा लागला आहे.
कापसाचे बाजार भाव पुढील कालावधीमध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे, कारण आता फक्त यंदाचा कापसाचा हंगाम अर्ध्यावर आला आहे. शेतकऱ्यांकडे आता कापूस त्यामानाने उपलब्ध नाही, त्यामुळे कापसाची आवक थंडावणार आहे. यावर्षी कापसाचे पेरणीला देखील उशीर होणार असल्याने पुढील हंगामात देखील कापसाची आवक कमी असेल. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते.
ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस आहे, त्यांना अजून कापूस बाजार भाव कमी होईल या भीतीने कापूस विक्री करण्याची गरज नाही. कारण आता येत्या 20 ते 30 दिवसात कापूस बाजार भावाला तेजी येऊ शकते. कापूस विक्री करायचा की नाही त्यासंबंधी निर्णय हा सर्वस्वी तुमचा आहे, इथे फक्त आम्ही कापूस बाजार भाव पुढे वाढेल की नाही यासंबंधी तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिली आहे.