अहमदनगरताज्या बातम्या

दिवाळीत फटाके ! आधी ही बातमी वाचा मगच ठरवा…

पोलिस प्रशासन अशा यंत्रणांकडून प्रक्रिया पूर्ण करून फटाक्यांची दुकाने उभारण्यासाठी परवानगी दिली जाते त्यानंतर सदरील ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Diwali 2023 : दिवाळी एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. सणानिमित्त फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यासाठी आगामी काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन,

पोलिस प्रशासन अशा यंत्रणांकडून प्रक्रिया पूर्ण करून फटाक्यांची दुकाने उभारण्यासाठी परवानगी दिली जाते त्यानंतर सदरील ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

मात्र, फटाके विकताना विक्रेत्यांनी विविध बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके हे विक्री करता येणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

Advertisement

परवाना नसल्यास फटाके विक्री नाही

फटाके विक्रीसाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. परवानगी न घेता फटाके विक्री केल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो. हे टाळण्यासाठी विक्रेत्यांना तात्पुरते विक्री स्टॉल सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली जाते.

दिवाळी सणासाठी फटाके विक्रीसाठी विक्रेत्यांना तात्पुरते परवाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येतात. परवाना नसल्यास फटाके विक्री करता येत नाहीत.

Advertisement

परवानगीसाठी करा अर्ज

शहरात फटाके विक्रीसाठी येतात. यात आवाज करणारे, रंगीबेरंगी फटाके उपलब्ध असतात. याकरिता संबंधित विक्रेत्यांना जिल्हा प्रशासन,

महानगरपालिका सोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळ अग्निशामक यंत्र आणि विविध ठिकाणच्या पोलिस यंत्रणांची परवानगी घेऊन दुकाने उभारण्यासाठी मान्यता दिली जाते. त्यामुळे परवानगीसाठी संबंधित विभागाला लवकर अर्ज करावा लागतो.

Advertisement

काय कागदपत्रे लागणार ?

विक्रेत्यांना फटाके परवानगीसाठी विहित नमुन्यातील अर्ज, फॉर्म एल -५, ओळखपत्र, महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र व साक्षांकित नकाशा, संबंधित जागा खासगी असेल तर जागामालकाचे ना हरकत व जागेचे कागदपत्र, संबंधित पोलिस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र व विहित परवाना फी भरणा केल्याचे चलन आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात.

आवाजाची तीव्रता १२५ डेसिबलपेक्षा कमी असावी

Advertisement

प्रशासनाने फटाके विक्री परवाना दिला तरी विक्री करण्यात येणाऱ्या त्या फटाक्यांची आवाजाची तीव्रता १२५ डेसिबलपेक्षा जास्त नसावी तसेच बेरियम सॉल्टयुक्त व त्या प्रकारच्या फटाक्यांची साठवणूक किंवा विक्री करू नये.

तहसील कार्यालयात करा अर्ज

दीपावली सणानिमित्त विस्फोटक नियम २००८ मधील तरतुदीनुसार विहित पद्धतीचा अवलंब करत तात्पुरते फटाके परवाने देण्यात येणार आहेत. संबंधितांनी सर्व बाबींची पूर्तता करूनच १५ ऑक्टोबर २०२३ पूर्वी त्या त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत.

Advertisement

परवाना तयार झाल्यानंतर तेथूनच परवाना घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिधाराम सालीमठ यांनी प्रसिदधी पत्रकाद्वारे केले आहे. शिफारस जोडावी.

अशी आहे प्रक्रिया

स्टेट बँकेत चलन भरावे. चलनाची मूळ प्रत अर्जासोबत जोडून पाठवावी. परवाना फीचे चलन तहसील कार्यालयातून मंजूर करून घेऊन तालुका ठिकाणच्या | स्टेट बँकेत भरता येतील. स्टॉल ग्रामपंचायत हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीची शिफारस अथवा महानगरपालिका हद्दीत असल्यास महानगरपालिकेची शिफारस तसेच नगरपालिका हद्दीत असल्यास नगरपालिकेची शिफारस जोडावी.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button