Home अहमदनगर Ahmednagar News : कर्जदार व माजी अध्यक्षांच्या पत्नीची कंपनी, कंपनीच्या खात्यात लाखो...

Ahmednagar News : कर्जदार व माजी अध्यक्षांच्या पत्नीची कंपनी, कंपनीच्या खात्यात लाखो रुपये वर्ग, नगर अर्बन प्रकरणी महत्वाची माहिती समोर

0
27
Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बँकेचा माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (वय ७२ रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) यांची पत्नी व नगर अर्बन बँकेचे कर्जदार यांनी एकत्रित मिळून एक कंपनी स्थापन केली.

त्या कंपनीच्या खात्यात तीन कर्जदारांच्या खात्यातून प्रत्येकी १५ लाख रूपये याप्रमाणे ४५ लाख रूपये वर्ग केले. ते रोख स्वरूपात काढल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून त्यांनी माजी अध्यक्ष कटारिया यांना अटक केली आहे.

त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी (दि.३) संपल्याने पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी न्यायालयात हजर केले होते.

सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला. जुलै २०१८ मध्ये नगर अर्बन बँकेच्या तीन कर्जदारांच्या बँक खात्यातून प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे ४५ लाख रूपये माजी अध्यक्ष कटारिया यांच्या पत्नी व कर्जदार यांच्या नावे असलेल्या कंपनीच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हा व्यवहार संशयास्पद असून, तपास करणे आवश्यक आहे. कंपनीच्या कागदपत्रांची संशयितांकडे मागणी करूनही ते दिले नाही. ते हस्तगत करून तपास करणे आवश्यक असल्याचे म्हटले.

दरम्यान या घोटाळ्याचा अत्यंत वेगाने तपास सुरु आहे. काही लोक पोलिसांच्या ताब्यातही आहेत. त्यामुळे यात आणखी काय समोर येते व कुणाकुणाचे नाव यात येतात याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here