अहमदनगर ब्रेकिंग : मिरवणुकीत डीजे ‘त्या’ तीन मंडळांविरुद्ध गुन्हे
ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी तीन मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ahmadnagar breaking : मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून रविवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मंडळांनी लावलेल्या डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली.
ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी तीन मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी तख्ती दरवाजा, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, मोची गल्ली, सारडा गल्ली, झेंडीगेट बेपारी, शहाजी चौक, तेलीखुंट, बेलदार गल्ली, ग्राहक भंडार, मंगलगेट, आडतेबाजार,
परशा खुंट, नालबंद खुंट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, बेपारी मोहल्ला, डावरे गल्ली हातपुरा, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय, सबजल चौक, जुना बाजार तख्ती दरवाजामार्गे मिरवणूक काढण्यात आली होती.
मिरवणुकीत सहभागी मंडळांकडून मोठमोठे डीजे लावण्यात आले होते. ध्वनिप्रदूषण होत असल्याने पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवाज कमी करण्याच्या सूचना केल्या.
मात्र, पोलिसांना न जुमानता मंडळांनी आवाज वाढवित ध्वनिप्रदूषण केले. ध्वनिप्रदूषण मापक यंत्राच्या सहाय्याने आवाजाची पातळी घेतली असता तीन मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी असलेल्या तीन मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या मंडळांवर गुन्हे दाखल
■जश्ने ईद मिलाद कमिटी मंडळाचे अध्यक्ष शहा फैसल बुरहान सय्यद (रा. तख्ती दरवाजा), डीजे मालक विनायक पोपट चव्हाण (रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर)
■ सहारा सोशल युथ फाउंडेशनचे अध्यक्ष लतीफ अल्ताफ खान (रा. तांबटकर गल्ली), डीजे मालक नागेश मच्छिंद्र लोखंडे (रा. वैदूवाडी, नगर)
■ जंगे शाहिद यंग पार्टीचे अध्यक्ष वसीम नईम खान (रा. काटववन खंडोबा, संजयनगर], डिजे मालक कृष्ण माणिक घाडगे (रा. राहुरी, ता. राहुरी)
मिरवणुकीनंतर पोलिसांनी हटविले फलक
शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर कोतवाली पोलिसांनी मिरवणूक मार्गावर लावलेले फलक हटविले असल्याची माहती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.