अहमदनगर

राज्यावर पुन्हा मास्क सक्तीचे संकट…आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने काही दिवसापूर्वीच राज्यातील मास्क सक्ती हटवण्यात आली होती. मात्र यातच आताच्या घडीला एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते, असे संकेतही दिले. राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्याच्या संदर्भात टास्क फोर्सने राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय या बैठकीनंतर कदाचित लागू केला जाऊ शकतो असं मला वाटत आहे.

दरम्यान पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मास्क नसल्यास आम्ही 500 रुपयांचा दंड ठेवला आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दिल्लीला लागून असलेल्या जिल्ह्यांत मास्क सक्ती केली आहे.

अशा प्रकारे मास्क सक्ती करायचा की नाही हा निर्णय मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेतील असंही आरोग्यमंत्री म्हणाले.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, याचबरोबर, “सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लसीकरणाचा त्यामध्ये देखील आपण वाढ करणार आहोत. हे आजच्या बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे.

त्यामध्ये सहा ते १२ वयोगटासाठी लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता हे महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठं काम, निश्चितप्रकारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button