अहमदनगर

Ahmednagar News : पाणीपुरवठा करणार्‍या टँकर चालकावर दबंगगिरी; शिवीगाळ करत मारहाण

Ahmednagar News : कल्याण रोड परिसरात पाणी वाटपासाठी जात असलेल्या टँकर चालक भैरवनाथ बन्सी बोरकर (वय 35 रा. वाळकी ता. नगर) याला रस्त्यात गाडी आडवी लावून मारहाण करण्यात आली. दिल्लीगेट येथे आज, मंगळवार सकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात राजू वाडेकर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. आनंद पार्क, कल्याण रोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर काम हे महापालिकेमार्फत होत असून ते सरकारी आहे.

त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत कर्मचार्‍यांनी कल्याण रोड परिसरातील पाणी वाटपाचे काम बंद ठेवले आहे. राजू वाडेकर याने टँकर चालक बोरकर यांना पाणी कधी घेऊन येणार, यासाठी फोन केला होता.

यावेळी बोरकर यांनी माझी गाडी खराब झाली आहे. ती दुरूस्त होतात पाणी घेऊन येतो, असे सांगितले. त्यानंतर बोरकर हे कल्याण रोड येथे पाण्याचा टँकर घेऊन जात असताना वाडेकर याने दिल्लीगेट येथे रस्त्यावर गाडी आडवी लावून बोरकर यांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button