Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरबापाला रिटायर करायचे नसते; आई- बापाविना घर सुनेसुने वाटायला लागते - आमदार...

बापाला रिटायर करायचे नसते; आई- बापाविना घर सुनेसुने वाटायला लागते – आमदार जितेंद्र आव्हाड

Ahmednagar News : बापाला रिटायर करायचे नसते, बाप हे घरातील ऊर्जास्रोत असतात. आई- बापाविना घर सुनेसुने वाटायला लागते,

असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर रविवारी (दि. ७) संगमनेरात केला.

स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगमनेरातील जाणता राजा मैदान येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यासाठी आमदार आव्हाड हे संगमनेरात आले होते. ‘सरकारी नोकरीत ५८ व्या वर्षी निवृत्ती आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत ६० व्या वर्षी निवृत्ती होते. तर राजकारणातही निवृत्तीला काही ठराविक वय आहे.

मात्र, काही जण ८४ वर्षे वय पूर्ण झाले तरी, थांबायला तयार नाहीत’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संदर्भाने केले होते. त्याबाबत पत्रकारांनी आमदार आव्हाड यांना विचारले असता त्यांनी जोरदार पलटवार केला.

आपले कर्तृत्व झाकण्याचा प्रयन करू नका- भास्कर जाधव

• एखाद्या कपड्यावर डाग पडला तर तो साबणाने, वॉशिंग पावडरने धुतला जाईल. परंतु विद्यमान सरकारच्या चारित्र्यावर, निष्ठेवर आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी वैचारिक परंपरा त्यांनी बरबाद केलेली आहे, त्याचा डाग कधीच धुतला जाणार नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे। नेते भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर केली.

• पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. अजित पवार तेच तेच बोलताहेत त्यावर उत्तर देण्याची गरज नाही. शरद पवार यांचे वय मोठे आहे, हे काय लपून राहिलेले नाही.

• कितीही वय असले तरीही आजही पवार साहेबांची काम करण्याची धमक आहे. ते जेवढे फिरताहेत तेवढे वीस वर्षाच्या तरुणालादेखील फिरता येणार नाही. त्यांच्या वाढत्या वयाकडे सातत्याने बोट दाखवून आपले कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न करू नका, अशी टीका शिवसेना नेते जाधव यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments