अहमदनगर

दाजीचा मेव्हण्यावर चाकू हल्ला

चाकूचा धाक दाखवून पत्नीला बळजबरीने ओढून घेऊन जात असताना मध्यस्ती करणार्‍या भावावर बहिणीच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना सिव्हिल हडको परिसरात घडली.

याप्रकरणी विकी मनोहरलाल शर्मा (रा. हडको) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्रनाथ सुभाष झेंडे (रा. चिखली, ता. श्रीगोंदा) व त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची बहिण रिंकी मच्छिंद्रनाथ झेंडे हिचे पतीबरोबर वाद सुरू आहेत. त्यामुळे ती भावाकडे राहते. तिचा पती झेंडे हा अचानक घरी आला.

त्याने फिर्यादीची बहीण रिंकी हिला चाकूचा धाक दाखवून जिन्यातून ओढत बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता झेंडे याने फिर्यादीच्या मांडीवर चाकूने वार केला.

यावेळी फिर्यादीची बहिण रिंकी हिच्या हातालाही जखम झाली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button