Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरचोरट्यांची डेअरिंग ! भरदिवसा घरफोड्या करूनच अधिकाऱ्यांना जोरदार आव्हान

चोरट्यांची डेअरिंग ! भरदिवसा घरफोड्या करूनच अधिकाऱ्यांना जोरदार आव्हान

Ahmednagar News : नुकत्याच नगर पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे नवीन पदभार घेतलेल्या अधिकाऱ्यांचे विविध संघटनाच्यावतीने स्वागत केले जात असतानाच

दुसरीकडे मात्र चोरट्यांनी भरदिवसा घरफोड्या करूनच या अधिकाऱ्यांना जोरदार आव्हान देत सलामीच दिली की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील चोरीची घटना ताजी असतानाच नगर तालुक्यातील दहिगाव येथे दिवसा ढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे.

दहिगाव येथील अशोक धर्मा जावळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १० हजार रूपये किमतीचे एक तोळा वजनाचे गंठण, १० हजार रु. किमतीचा एक तोळा वजनाचा सोन्याचा सर,

तसेच २० हजार रु. किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ४० हजार रु. किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत अशोक जावळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना घडती न घडती तोच दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री जावळे यांच्या पासून २०० मीटर अंतरवार राहणाऱ्या बाळासाहेब जाणकु हिंगे यांनी घराच्या कामासाठी आणलेली अंदाजे ३५ हजार रु. किमतीची स्टाइल फरशी चोरीस गेल्याची घटना घडली.

याबाबत अद्याप गुन्हा नोंद झाली नसली तरी लागोपाठ झालेल्या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील जेऊर कोल्हार घाटात भरदिवसा दाम्पत्याला अडवून सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे सोने ओरबाडून नेण्याची घटनाही नुकतीच घडली आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यानुसार नगर मधील सर्वच पोलीस ठाण्यात नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे.

नवीन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच सर्वच हद्दीत चोरांनीही त्यांना जोरदार सलामी दिली आहे. नवीन कारभाऱ्यांना चोरांचा हा संदेशच म्हणावा का….? असा प्रश्न यनिमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान दहिगाव साकत परिसरात यापूर्वीही अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या, घरफोड्या तसेच दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. चोऱ्या करताना चोरट्यांकडून अमानुषपणे मारहाण केली जात आहे.

तर काहींना कायमस्वरूपीचे अपंगत्व आले आहे. काडी काडी जमवून उभा केलेला संसार उद्ध्वस्त होत आहे. याच परिसरात वारंवार होणाऱ्या याघटनांमुळे दहिगाव साकत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कर्तव्याची जाण अन् कायद्याचा धाक राहिला नसल्याने वृद्ध नागरिक लहान मुले, महिला यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

नवीन पदभार स्वीकारलेल्या कारभाऱ्यांनी यासर्व घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या खास शैलीत कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

दहिगाव पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साकतखुर्द येथील बहुचर्चित पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याचा तपास मोठ्या शिताफिने लावला.

१ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दरोडा पडला होता. यामध्ये अज्ञात ७ तै ८आरोपिनी पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करत पिस्टलचा धाक दाखवत मोठा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता.

या घटनेचा नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे,

गणेश इंगळे यांच्या पथकाने दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करत चार आरोपीना अटक केले होते. त्यानंतर या परिसरात चोऱ्या होत नव्हत्या मात्र आता भरदिवसा घरे फोडली जात आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments