अहमदनगर
सासू सोबत वाद झाल्याने सून दोन मुलांसह बेपत्ता

अहमदनगर- सासू – सूनामध्ये वाद झाल्याने अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना केडगाव उपनगरात घडली. सासू सोबत झालेल्या वादानंतर सूनेन आपल्या दोन मुलांसह घर सोडले. ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून शनिवारी तक्रार दाखल झाली आहे. केडगाव उपनगरातील पाच गोडावून, शाहुनगर रोड येथे राहणारी 30 वर्षीय विवाहिताचे शुक्रवारी रात्री तिच्या सासूसोबत वाद झाले. यानंतर तिने तिच्या नऊ वर्षाचा मुलगा व पाच वर्षाची मुलगी घेऊन राहत्या घरातून निघून गेली आहे.
ती तिच्या आई-वडिलांकडे न जात कुठे तरी बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला आहे.