ताज्या बातम्याराशीभविष्य

‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली पित्यासाठी ठरतात लक्ष्मी, वडिलांचे नशीबच बदलते

वडिलांच्या प्रेम आणि आपुलकीच्या मायेखाली वाढलेल्या मुली कुटुंबात चमक तर आणतातच, शिवाय वडिलांचे नशीबही उजळवतात.

भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की, मुलीच्या जन्मानंतर वडिलांचे नशीबही बदलते. म्हणूनच मुलीचा जन्म म्हणजे लक्ष्मीचे आगमन मानले जाते.

वडिलांच्या प्रेम आणि आपुलकीच्या मायेखाली वाढलेल्या मुली कुटुंबात चमक तर आणतातच, शिवाय वडिलांचे नशीबही उजळवतात.

भारतीय ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला खूप महत्त्व आहे, या शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्म क्रमांकावरून वर्तवले जाते.

Advertisement

मूलांक म्हणजे जन्मतारखेच्या अंकांची बेरीज, उदाहरणार्थ, समजा एखाद्याचा जन्म महिन्याच्या 21 तारखेला झाला, तर त्याचा मूलांक 3 असेल.

याठिकाणी आपण 3 मूलांक संख्या असलेल्या मुलींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी पाहुयात सोबतच हा मूलांक संख्या असलेली मुलगी तिच्या वडिलांसाठी किती भाग्यवान असते ते देखील पाहुयात –

*मेहनत आणि परिश्रम

Advertisement

अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या मुलींचे मूल्यांक 3 असते. या मुली मनमिळाऊ स्वभावाच्या असतात.

या मुली खूप मेहनती आणि त्यांच्या ध्येयाप्रति समर्पित असतात. आयुष्यात एक विशिष्ट स्थान मिळवत या मुली आपल्या कर्तृत्वाने आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करतात.

*राण्यांसारखी जीवनशैली जगतात

Advertisement

आत्मविश्वासू असलेल्या आणि मूलांक 3 असलेल्या मुली त्यांचे व्यावसायिक जीवन आणि त्यांचे कौटुंबिक जीवन यांच्यात चांगले संतुलन राखण्यास सक्षम असतात.

इतरांना त्या नेहमी मदत करतात. अशा मुलींचे सामाजिक वर्तुळ मोठे असते. 3 मूलांक असणाऱ्या मुली विलासी जीवन जगतात.

*त्यांच्या हस्तरेषांमधे असते भाग्य

Advertisement

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेल्या मुलींच्या हस्तरेषांमधे वडिलांचे भाग्य असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, त्यांच्या नशिबा बरोबरच त्यांच्या वडिलांचे नशीबही चमकते.

निर्भय आणि धैर्यवान स्वभावाच्या अशा मुलींना देवी लक्ष्मीचे अवतार मानले जाते आणि त्या ज्या कुटुंबात राहतात त्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि वैभव नेहमी राहते.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button