Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : दौंड-धाराशिव रस्त्याचे काम रखडले सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; प्रवाशांना...

Ahmednagar News : दौंड-धाराशिव रस्त्याचे काम रखडले सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; प्रवाशांना मनस्ताप, भाविकांचे हाल

Ahmednagar News : राशीनमधून गेलेल्या दौंड-धाराशिव रस्त्याचे काम गेली काही महिन्यांपासून रखडले. या कामाबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन आहे.

या मंदावलेल्या रस्त्याच्या कामामुळे स्थानिकाना धूळ मातीचा, तर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राशीन-सिद्धटेक तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांचे प्रचंड हाल होत आहे.

आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून ३५० कोटींहून अधिक रुपये खर्चाच्या या रस्त्याचे काम चालू आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने कोरटी (ता. करमाळा) ते सिद्धटेक (ता. कर्जत) सुमारे ४०-४५ किमी रस्ता खोदून भराव टाकून काम बंद केले.

याचा प्रवाशासह भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. राशीन व सिद्धटेक रस्त्या लगत राहणाऱ्या गावातील रहिवाशांना या रस्त्याने नकोरे बाबा म्हणत वळसा मारून खेड, अंबालिका कारखाना मधल्या मार्गाचा वापर करावा लागतो.

यामुळे वेळेत व खर्चात भर पडत आहे. त्यातच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्येमुळे अपघाताची शक्यता आहे.

रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा आंदोलन : जाधव

शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चुन करण्यात येणारे दौंड-धाराशिव रस्त्याचे काम ठेकेदार व संबंधित विभागाने तातडीने सुरू करावे,

अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे कर्जत-जामखेड विधानसभा समन्वयक सुभाष जाधव यांनी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments