अहमदनगर

विवाहस्थळी तरुणावर जीवघेणा हल्ला ! माझ्याकडे काय बघतोस असे म्हणू…

कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर शिवारातील शहा रस्त्यावर काल दुपारी एक वाजेच्या सुमारास एका विवाहस्थळी फिर्यादी हा मंडपाच्या बाहेर बसलेला असताना आरोपी गणेश संजय कोळपे,

योगेश संजय कोळपे,अशोक शेरमाळे याचा मुलगा (नाव माहिती नाही) हे संगनमत करून आले व ते फिर्यादीस म्हणाले की,तू,माझ्याकडे काय बघतोस असे म्हणून त्यास चाकू,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने हनुवटी व डोळ्यावर,दोन्ही हातावर दोन्ही पायावर छातीवर मारहाण करून,तुला संपवून टाकतो असे म्हणून गंभीर दुखापत करून फिर्यदीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला

असल्याचा गुन्हा कोळपेवाडी येथील फिर्यादी सुखदेव (सचिन) रामचंद्र कोळपे (वय-38) याच्याविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्यामुळे शहाजापूर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी हा कोळपेवाडी येथील पाच चारी येथील रहिवासी असून आरोपी हे शहाजापूर येथील रहिवासी आहे.

त्यांच्यात काही कारणावरून वाद आहेत.दि.25 मे रोजी दुपारी फिर्यादी सुखदेव कोळपे हा शहाजापूर येथील एका संबंधित लग्नाला गेला असता तो मंडपाच्या बाहेर उभा असताना त्या ठिकाणी आरोपी गणेश संजय कोळपे,

योगेश संजय कोळपे,अशोक शेरमाळे याचा मुलगा (नाव माहिती नाही) हे संगनमत करून आले व त्यांनी फिर्यादीस म्हणाले की,तू, माझ्याकडे काय बघतोस असे म्हणून त्यास चाकू,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने हनुवटी व डोळ्यावर,दोन्ही हातावर दोन्ही पायावर छातीवर मारहाण करून,

तुला संपवून टाकतो असे म्हणून गंभीर दुखापत करून फिर्यादिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र हाणामारीचे खरे कारण समजू शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button