महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; ठेकेदारसह तिघांवर गुन्हा

अहमदनगर- कंत्राटी पद्धतीने महाविरण कंपनीच्या लाईनचे काम करणारा कर्मचारी नवनाथ मारुती सुपेकर (वय 28) रा. वडझरी ता.संगमनेर) याच्या मुत्यूस जबाबदार असणार्या ठेकेदार, महाविरणच्या कंपनीच्या लाईनमन, मदतनीस अशा तीन जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात मृत्युस कारणीभुत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
राहाता पोलिसात प्रतिक ज्ञानेश्वर सुपेकर याने फिर्याद दिली आहे. दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील रांजणगाव येथील दूध संकलन केंद्रासमोर आरोपी विज वितरण कंपनीचे परमीट देणारे लाईनमन मंदाबाई सतिष रणछोड (रा. राहाता), मदतनीस वैभव बाळासाहेब पटारे (रा. अस्तगाव, ता राहाता) व ठेकेदार योगेश संजय वाबळे (रा. हिवरेबाजार, पारनेर) या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपींनी विद्युत लाईन व्यवस्थित बंद केली नाही तर एखाद्याला शॉक लागुन मृत्यु होवु शकतो ही बाब माहीत असताना देखील निष्काळजीपणे शहानिशा न करता त्यांनी यातील फिर्यादीचा चुलता नवनाथ मारुती सुपेकर यांना इलेक्ट्रीकच्या मेन वायर असलेल्या डीपीवर काम करण्यास सांगुन त्यांचे शॉक लागुन मृत्युस कारणीभुत झाले असल्याने राहाता पोलिसानी वरील तीन अरोपी विरोधात 304 (अ) 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.