अहमदनगर
महिलेच्या नावे संकेतस्थळावर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी

अहमदनगर- नगर शहरात राहणार्या एका महिलेच्या नावे एका संकेतस्थळावर बनावट अकाऊंट तयार करून त्याव्दारे संबंधीत महिलेची बदनामी केली. रविवारी घडलेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित फिर्यादी महिलेला तिच्या व्हॉट्सअॅपवर रविवारी एक मेसेज आला. त्या मेसेजवरून पीडितेला आपल्या नावाच्या पुढे ‘कॉलेज गर्ल पुणे’ असे लिहून पाठविले होते.
पीडित महिलेल्या बनावट अकाऊंट तयार केल्याचे समजले. या अकाऊंटवर तिचा व्हॉट्सअॅप क्रमांकही टाकल्याचे दिसून आले. त्यातून बदनामी केल्याचा प्रकार लक्ष्यात आल्याने पीडिताने रविवारी दुपारी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.