फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी

अहमदनगर- महिलेच्या नावे फेसबुकवर दोन बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केली. या प्रकरणी कोपरगाव तालुक्यातील पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करणार्या अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या फोटोचा व नावाचा वापर करून एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर फिर्यादी यांच्या नावाचा वापर करून त्यापुढे कॉल गर्ल औरंगाबाद व मोबाईल नंबर टाकला होता. 5 नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार फिर्यादीच्या लक्ष्यात आला.
तसेच दुसरे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून फिर्यादी व फिर्यादीच्या घरातील लोकांची बदनामी केली. हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर फिर्यादी यांनी 7 नोव्हेंबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.