अहमदनगर

हद्दपार सराईत आरोपीचे नगरात वास्तव्य; पोलिसांकडून अटक

हद्दपार असलेला आरोपी अहमदनगर शहरात फिरत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच त्यांनी त्याला पकडून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

त्याला अटक करण्यात आली आहे. अभिषेक दिलीप लोणारे (वय 20 रा. निलक्रांती चौक, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार सचिन जगताप यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार जगताप, दत्तात्रय जपे, त्रिभुवन यांचे पथक सोमवारी रात्री तोफखाना हद्दीत गस्त घालत असताना

त्यांना माहिती मिळाली की, अहमदनगर जिल्ह्यातून दीड वर्षांकरीता हद्दपार केलेला आरोपी लोणारे हा सारडा कॉलेज परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत आहे.

पथकाने मिळालेल्या माहितीनुसार खात्री केली असता आरोपी लोणारे हा सदर ठिकाणी दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button