अहमदनगर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा व कार्याचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव नाकारल्याचे निषेधार्थ एकसंघ मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्र सरकारचा निषेध नोंदवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव समाविष्ट करण्याच्या मागणीचे निवेदन पोपट नाना यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली

यावेळी भगवान जगताप, विजय वडागळे, नामदेवराव चांदणे, सुनील पारधे, विनोद सोनवणे, सुनील सकट, बाबासाहेब साठे, संतोष शिरसाठ, अशोक भोसले, दिलीप जाधव, आकाश लोखंडे, हर्षद शिर्के, प्रकाश लोखंडे, सचिन घोरपडे, रोहित शिंदे, ओमकार नवरखेले, गणेश आडागळे, राहुल खरात, अविनाश भालेराव, निरंजन बाबू, विजय पाचरणे,

संदीप पारधे, अनंद जगताप, साहेबराव पाचारणे, उमेश साठे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व श्रम मंत्रालय द्वारा कार्यरत असलेल्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांनी भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्रतिष्ठित सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार महापुरुषाची जयंती व पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यासाठी यादी प्रसिद्ध केली होती

या यादीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव धीरे धीरे गरजेचे असताना देखील फाऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला ते प्रतिष्ठित नव्हते असे नमूद केले

या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून पंधरा पोवाडे आठ गीतलेखन 7 चित्रपट कथा असं ते साहित्य संपत्तीची निर्मिती केली या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षित घटकांच्या व्यथा मांडल्या जगाच्या सत्तावीस भाषेत त्यांच्या साहित्याचे भाषांतरण झाले

व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अण्णाभाऊ साठे यांनी सात समुद्रापार पोहोचवला असे असताना देखील सत्यशोधक बहुजन समाजाचे जन नायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली

आहे व संबंधित संस्था अधिकाऱ्यावर सेवा बडतर्फ करण्याची कायदेशीर कारवाई करून व महापुरुषांचा अवमान केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button