हद्दपार आरोपीचा जिल्ह्यात वावर; एलसीबीकडून अटक

जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मनोज गोरक्षनाथ डोंगरे (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) हा जिल्ह्यात वावरताना आढळल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले.
जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आदेशाचा भंग करून जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करत असल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार देवेंद्र शेलार,
शंकर चौधरी, रोहित येमुल, सागर ससाणे व मयुर गायकवाड यांच्या पथकाने आरोपी मनोज डोंगरे याचा शोध सुरू केला. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी मनोज डोंगरे या हद्दपार आरोपीला राहुरी खुर्द येथून ताब्यात घेतले. त्याच्या विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.