धनंजय मुंडेंना आव्हान देणाऱ्या करुणा मुंडेंचं डिपॉझिट जप्त

बीडमधून थेट धनंजय मुंडे यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेल्या करुणा शर्मा मुंडे यांना कोल्हापूरमध्ये मात्र मोठा पराभव पत्करावा लागला आहे.
करुणा शर्मा यांचं डिपॉझिट देखील या निवडणुकीत जप्त झालं असून त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा अवघा शंभरीपार पोहोचला आहे. करुणा शर्मा यांनी मात्र माध्यमांशी बोलताना बीडमध्ये विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तसेच, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कोल्हापुरातील आगामी नगरपालिका निवडणुका लढवण्याचं बळ आपल्याला मिळाल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा मुंडे यांना अवघी १३३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचं डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. “मी फार मोठी यंत्रणा लावली नव्हीत.
माझा प्रचार होऊच दिला नाही. तुम्ही पाहाल तर कोल्हापूरच्या जनतेचे मी आभार मानते की मी दोनच दिवस प्रचार केला. पण त्यांनी मला एवढा मान दिला, की येणाऱ्या काळात मी ८१ नगरपालिकेचे उमेदवार उभे करण्याची हिंमत करू शकेन. मी फक्त दोन दिवस प्रचार केला होता”, असं देखील त्या म्हणाल्या.