अहमदनगर

आता शिंगणापुरात देवस्थानने सुरु केली तेलविक्री; व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार

शिंगणापुरात तेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आता देवस्थाने प्रवेशद्वारातच तेलविक्री सुरू केली आहे. याचा मोठा फटका मंदिराबाहेरील व्यावसायिकांना बसणार आहे. या प्रश्नासंदर्भात व्यावसायिक मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत.

देवस्थानचे मंदिरालगत एक तेल विक्री स्टॉल असून आता प्रवेशद्वारा जवळच आणखी एक दुसरा स्टॉल थाटल्याने बाहेरील तेल विक्री घटली असून देवस्थानने प्रवेशद्वाराजवळील असलेला तेल विक्री स्टॉल बंद करावा, अशी मागणी केली जात आहे.

व्यावसायिकांच्या नेमक्या समस्यां काय आहे?

दरम्यान देवस्थानला उत्पन्न मिळावे म्हणून व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याकरिता लिलाव पद्धत वापरून व्यवसाय करण्यास परवानगी जाते. परंतु तेच व्यवसाय जर देवस्थानने केले तर बाहेरील धंद्यांना आर्थिक फटका बसतो. काही व्यवसायिक रितसर दरमहा ठराविक रक्कम देत आहेत. त्यांना एक नियम आणि दुसर्‍याला एक नियम असा भेदभाव केला जात असल्याने व्यावसायिक हे गार्‍हाणे ना. गडाख यांच्याकडे मांडणार आहेत.

नियमांचे सर्रास उल्लंघन…

देवस्थानने सुट्टे तेल विक्री करण्यास बंदी घातली आहे. तो नियम धाब्यावर बसवून काही व्यावसायिक रिकाम्या बाटलीत तेल भरून मोठ्या प्रमाणात विक्री करतात आणि भाविकांची मोठी लूट करतात. असा प्रकार सर्रास चालू आहे. काहींना बंद बाटलीतून तेल विक्रीसाठी सक्ती केली आहे आणि दुसरीकडे सुट्टे तेल बाटलीत भरून विकले जाते. नियम पालन करणार्‍यांवर अन्याय होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button