Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरडाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर, मी १७०० कोटींची कामे केली - आ.नीलेश...

डाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर, मी १७०० कोटींची कामे केली – आ.नीलेश लंके

Ahmednagar News : आजपर्यंत पारनेरमधील जनतेसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांची विकासकामे दिली. निघोजसाठी सर्वाधिक ७० कोटी ११ लाखांची विकासकामे दिली. डाळ साखर वाटप करण्यापेक्षा जनतेसाठी विकासकामे नक्कीच फायदेशीर असतात अशी टिप्पणी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत आ.नीलेश लंके यांनी केली.

मंगळवार (दि.३०) सायंकाळी सात वाजता निघोज परिसरातील २० कोटी ५१ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी मंळगंगा मंदीरासमोर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष शांताराम लंके, मंळगंगा कंट्रक्शनचे अध्यक्ष अमृता रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. लंके म्हणाले, ज्या लोकांना काल परवा डाळ व साखर वाटप करताना डोक्यावर घेऊन नाचत होते त्यांनी तुम्हाला काय विकासकामे दिली आहेत याचे जनतेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

गर्दी नाही म्हणून शाळेची पोरं उभी करून गर्दी जमा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. आपण जे बोलतो तेच करतो आणी जे करतो तेच आपण बोलतो असे ते म्हणाले.

रांजणखळगे, निघोज पिंपरी जलसेन रस्ता तसेच शाळा खोल्या, जलसिंचन बंधारे यासाठी २० कोटी ५१ लाख रुपयांचा निधी खर्च होणार असून आजपर्यंत निघोज परिसरासाठी ७० कोटी ११ लाख रुपयांची विकासकामांचा विचार करता साडेअकरा हजार मतदानाचा विचार केला तर प्रत्येक मतदाराला ६१ हजार रुपये विकासकामांसाठी खर्च केले आहेत असे ते म्हणाले.

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी आमदार नीलेश लंके यांनी आजपर्यंत   सर्वाधिक निधी निघोज परिसरासाठी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी विविध संस्था, सामाजिक मंडळे तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार लंके यांचा सत्कार प्रभाकर कवाद, शांताराम लंके, ज्ञानदेव लंके, सोमनाथ वरखडे यांच्या हस्ते करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments