तमाशाच्या कार्यक्रमात सरपंचांचा धिंगाणा; जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी घडली घटना

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे हरिहर केशव गोविंद महाराज यात्रेनिमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात उक्कलगावच्या सरपंचाने चांगलाच धिंगाणा घातल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उक्कलगाव येथे हरिहर केशव गोविंद महाराज यात्रेनिमित्त 4 एप्रिल 2022 रोजी लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा तसेच यात्रेसाठी पोलीस बंदोबस्त देखील होता.
कार्यक्रम रात्री 9 वा. सुरू झाला तो रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास बंद केला. त्यावेळी उक्कलगावचे सरपंच नितीन आबासाहेब थोरात हे कार्यक्रमाचे स्टेजवर उभे राहून हातात माईक घेऊन कार्यक्रम कोणी बंद पाडला आम्हाला माहित आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे असे स्टेजवर जावून त्यास समजावून सांगत त्यांना स्टेजचे खाली आणले.
कार्यक्रम पोलिसांनी का बंद केला? त्यांना कोणी सांगितले? गाव आपले आहे, असे म्हणून ते चिथावणी देत होते. सरपंच नितीन थोरात यांना समजावुन सांगत तेथुन काढून दिले.
त्यानंतर मंगळवार रोजी मध्यरात्री सरपंच धोरात हे लोकांना घेवून थांबलेला असताना पोलिसांना पाहून त्यांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नितीन आबासाहेब थोरात यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.