Dhoni Candy Crush Video : लाडक्या धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिले आणि ३ तासांत तब्बल ३० लाख चाहत्यांनी डाउनलोड केली ही गेम
प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी कँडी क्रश गेम खेळताना पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्या वर्गामध्ये ही गेम खेळण्याचा मोठा उत्साह आल्याचे पाहायला मिळाले आहे.

Dhoni Candy Crush Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये एम. एस. धोनीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या धोनीच्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे.
जिथे धोनी तिथे त्याचे फॅन याचा प्रत्यय आज आला आहे. कारण धोनी गेम खेळताना पाहून त्याच्या तब्बल ३० लाख चाहत्यांनी ३ तासामध्ये एक गेम डाउनलोड केली आहे. त्यामुळे या गेमची बरीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर धोनीचा गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कँडी क्रश ही गेम भारतामध्ये खूपच फेमस आहे. मात्र आता ही गेम प्रसिद्ध क्रिकेटर धोनी खेळताना पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांनी ३ तासांमध्ये तब्ब्ल ३० लाख लोकांनी डाउनलोड केली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये धोनी विमानाने प्रवास करताना दिसत आहे. तसेच तो त्याच्या टॅबवर कँडी क्रश गेम खेळत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. यांनतर त्याच्या चाहत्या वारंगने मोठ्या प्रमाणात ही गेम डाउनलोड केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महेंद्रसिंग धोनी विमानाच्या बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी एक एअर होस्टेस चॉकलेटने भरलेला ट्रे घेऊन धोनीकडे जाते आणि त्याला चॉकलेट देते.
MS Dhoni – the crowd favourite. pic.twitter.com/ltpud9P9Jj
Advertisement— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2023
हे पाहून धोनी हसतो आणि चॉकलेट उचलतो. दरम्यान, लोकांच्या नजरा धोनीच्या त्या टॅबलेटवर पडल्या ज्यामध्ये त्याने कँडी क्रश खेळताना दिसून आला. तेव्हापासून #CandyCrush सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला.
विमानामध्ये धोनीला एअर होस्टेसकडून चॉकलेट देताना आणि धोनीच्या टॅबवर सुरु असलेल्या कँडी क्रशचा व्हिडीओ एअर होस्टेसने तिच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. तेव्हापासून ही गेम आणखीनच प्रकाशझोतात आली आहे.
3 तासात 30 लाख लोकांनी डाउनलोड केले
महेंद्रसिंग धोनीला कँडी क्रश खेळताना पाहून त्याच्या चाहत्यांना देखील ही गेम खेळण्याचा मोह आवरला नाही. धोनीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर ३ तासांतच ३० लाख लोकांनी कँडी क्रश गेम डाउनलोड केली आहे. त्यांनतर कंपनीकडून देखील धोनीचे आभार मानण्यात आले आहेत.