Diabetes : किडनी आणि हृदयावर डायबिटीस कसा परिणाम करते? ‘ही’ लक्षणे दिसत असतील तर सावध राहा
मधुमेह आजाराला लाखो लोक झुंजत आहेत. यावर अनेक उपाय करूनही लोक यातून बाहेर पडत नाहीत. यामुळे शरीरात खूप परिणाम होतो.

Diabetes : सध्या देशात मोठ्या प्रमाणात लोक मधुमेह या आजाराने ग्रासले आहेत. हा एक असा आजार आहे ज्यावर योग्य उपाय नाही. मात्र साधा दिसणारा हा आजार कधी कधी गंभीर देखील होतो.
यामध्ये किडनी आणि हृदया खराब होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की मधुमेहामुळे तुमच्या शरीरातील अवयवांना, जसे की डोळे, किडनी आणि हृदयाचे नुकसान होऊ शकते.
तसे पाहिले तर मधुमेहामुळे शरीराच्या कार्यावर परिणाम होतो, कारण अशा स्थितीत रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. यावर नियंत्रण न ठेवल्यास लठ्ठपणा, किडनीचे आजार, हृदयविकार अशा समस्या उद्भवू शकतात.
सध्या देशात मोठ्या संख्येने लोक या आजराचा सामना करत आहेत. अशा वेळी तुमचे तुमच्या शरीराकडे असणारे लक्ष या आजारात खूप महत्वाची भूमिका बजावत असते. तुमचा आहार हा योग्य रीत्या असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला या आजाराची तीव्रता कमी करता येईल.
मधुमेहामध्ये हे अवयव खराब होतात
1. हृदय
वर्ल्ड जर्नल ऑफ डायबिटीजच्या मते, मधुमेही रुग्णांना अनेकदा लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया यांसारखे हृदयाशी संबंधित धोके असतात. एखाद्या व्यक्तीला एकदा मधुमेह झाला की भविष्यात त्याला हृदयविकाराचा धोका निर्माण होतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल.
याशिवाय मधुमेहामुळे ब्रेन स्टोकची समस्याही वाढते. म्हणूनच, आपण दररोज आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासणे आणि असा धोका टाळण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे.
2. किडनी
अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या क्लिनिकल जर्नलनुसार, 40 टक्के मधुमेही रुग्णांना डायबेटिक किडनी रोग आहे, जो जगभरातील क्रॉनिक किडनी रोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.
सामान्य कारण म्हणजे मधुमेहामुळे मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे रक्तातील अशुद्धता फिल्टर करण्याची क्षमता कमी होते. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास, तुमची किडनी निकामी होऊ शकते किंवा तुम्हाला डायलिसिस करण्याची गरज भासू शकते. अशा प्रकारे तुम्ही याकाळात तुमच्या शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.