Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरसरकारच्या आडमुठ्या भुमिकेमुळे सर्वसामान्यांची अडचण ! राजकीय विरोधासाठी सार्वजनिक हिताच्या कामांना...

सरकारच्या आडमुठ्या भुमिकेमुळे सर्वसामान्यांची अडचण ! राजकीय विरोधासाठी सार्वजनिक हिताच्या कामांना खीळ

Ahmednagar News : निधी अभावी रखडलेल्या तालुक्यातील प्रलंबित कामांबाबत आणि सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत सरकारच्या आडमुठ्या भुमिकेमुळे तालुक्यातील सामान्य माणसाची अडचण होत असूनही सरकारला मात्र या गोष्टींचं गांभीर्य लक्षात येत नाही.

जामखेड तालुक्यातील विविध कामांसाठी आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम, तलाठी कार्यालये, महसूल कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचं काम ही कामे निधी अभावी रखडलेली आहेत.

याचा फटका सर्व सामान्य माणसाला बसत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती राजश्रीताई सुर्यकांत मोरे, अदिवासी पारधी समाजाचे नेते प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, काकासाहेब कोल्हे, संचालक प्रकाश सदाफुले, नगरसेवक अमित जाधव, प्रदिप शेटे,

माजी सरपंच नरेंद्र जाधव, शहर अध्यक्ष आमोल गिरमे, अॅड. अनिल बारवकर, संगीता तोरडमल, वैशाली शिंदे, अनुराधा आडाले, स्मिता गुलाटी, आरती राळेभात, सुनिता कांबळे, मंदा मोरे, रंजना पवार, रूपाली कस्तुरे, अमृता लोहकरे आदि महिलांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, कर्जत-जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’ला राजकीय विरोध करून जाणीवपूर्वक अंतिम मंजुरी दिली जात नाही. शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी जाहीर केलेलं अनुदान, पीक विमा आणि अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाईही मिळालेली नाही.

तसंच तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचे टँकरची मागणीही वाढली आहे, परंतु मागणीनुसार पुरेसे टैंकर मंजूर केले जात नाहीत.

केवळ राजकीय विरोधासाठी सार्वजनिक हिताच्या कामांना खीळ घालण्याचं काम होत आहे. लोकांना भेडसावत असलेलं हे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार जातीय वाद,

धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढं आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम करत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्त्वाला तडा जातोच पण राज्याच्या प्रगतीलाही अडथळा निर्माण होत आहे आणि शेवटी नुकसानही सामान्य माणसाचंच होत आहे.

तालुक्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचं नुकसान होऊनही विम्याची नुकसानभरपाई मिळत नाही. नोकरभरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे.

यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत.

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. याची सरकारने गांभीयनि दखल घ्यावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments