अहमदनगर
Ahmednagar News : चिथावणीखोर मजकूराचे डिजीटल स्क्रिनवर प्रसिध्दी; तिघे आरोपीच्या पिंजर्यात

Ahmednagar News : महात्मा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात माळीवाडा येथे चिथावणीखोर मजकुर डिजीटल स्क्रिनवरून प्रसिद्ध केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजक केदार विजय रासकर, दिनकर मारूती चेडे
(दोघेही रा. माळीवाडी, अहमदनगर) आणि डिजीटल स्क्रिन मालक केतन सुनील अरकल (रा. तोफखाना, अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक योगेश खामकर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने माळीवाडा या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमानिमित्त विद्यूत रोषणाई, स्पिकर आणि डिजीटल स्क्रिन लावण्यात आला होत्या.
त्याठिकाणी लावलेल्या डिजीटल स्क्रिनवर चिथावणीखोर मजकुर लावण्यात आला होता. यामुळे कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.