महाविकास आघाडीत पहिल्यापासून मतभेद | विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्पष्टोक्ती

Ahmednagar news : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर आघाडीतील नेत्यांनी संगनमताने अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती, तर अध्यक्षपद रिक्त राहिले नसते.
विधानसभा अध्यक्षांनीच या १६ आमदारांना अपात्र ठरवले असते. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची वेळच आली नसती, अशी स्पष्टोक्ती राज्याचे विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अंतर्गत मतभेद आणि चुकांमुळेच अशी परिस्थिती ओढावली असल्याची कबुली शुक्रवारी अजित पवार यांनी दिली.
पवार पुणे जिल्हा दौऱ्यावर असून, कोथरूडमधील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पवार म्हणाले, तत्कालीन विधानसभा अध्यक्ष (नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याबाबत सांगणे महत्त्वाचे होते
निकालामुळे देशात दूरगामी परिणाम
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देशात दूरगामी परिणाम घडणार आहे. विशेषतः यातून सर्वांना •मोठा धडा मिळाला आहे. जेव्हा देशातील कुठल्याही विधानसभेत अशा प्रकारचा प्रसंग निर्माण होईल,
तेव्हा या महाराष्ट्रातील निकालाचा दाखला दिला जाईल. यातून पक्षांतर्गत बंदी कायद्याबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण राजकारणात स्थिरता येण्यासाठी बहुमत असल्यानंतर कुठली अडचण येत नव्हती; परंतु आता या निर्णयामुळे सगळ्याच गोष्टीला खीळ बसण्याची शक्यता आहे