Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरशेतकरी व मध्यमवर्गीयांसाठी निराशा जनक अर्थसंकल्प : आ. थोरात

शेतकरी व मध्यमवर्गीयांसाठी निराशा जनक अर्थसंकल्प : आ. थोरात

Ahmednagar News : शेतकरी व मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही मदत नसणारे हे बजेट पूर्णपणे निराशाजनक असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना आमदार थोरात म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा निराशाजनक आहे.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर शेअर बाजारामधील घडामोडी अवलंबून असतात. मात्र यावेळेस शेअर बाजार पूर्णपणे ठप्प आहे.

संपूर्ण मध्यमवर्ग महागाईमध्ये होरपळत आहे. अशा वेळेस त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. भरमसाठ वाढलेल्या महागाईवर सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.

शेतकऱ्यांना मदत केली असे सांगतात परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही. राज्याचे हक्काचे निधी केंद्र सरकारकडे थकलेले आहेत.

त्यातून राज्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे राज्यांना प्रगती करणे सुद्धा अवघड जाणार आहे. एकूणच संपूर्ण निराशजनक असलेला हा अर्थसंकल्प असून सत्ताधारी मात्र हरलेल्या डावांचा जयजयकार मीडियाच्या साह्याने करतील.

मात्र जनता पूर्णपणे नाराज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार थोरात यांनी व्यक्त केली आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments