अहमदनगर

दोंडाईचा, धुळे येथे राज्य क्रीडा पुरस्कारांचे अर्जून पुरस्कारार्थी काका पवार यांचे हस्ते वितरण

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोंडाईचा, धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ आयोजित राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण रविवार 20 मार्च रोजी हस्ती सांस्कृतिक भवन दोंडाईचा येथे होत आहे.

अर्जून पुरस्कारार्थी काका पवार यांच्या शुभहस्ते व क्रीडा सह संचालक चंद्रकांत कांबळे, औद्योगिक सुरक्षा सहसंचालक देविदास गोरे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी अशोक दुधारे, उद्योगपती अशोक जैन, क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, औदयोगिक सुरक्षा मा उपसंचालक धनंजय जामदार, डॉ बलवंत सिंग, प्रदिप तळवेलकर, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, संजय पाटील, रविंद्र निकम, महेंद्र राजपूत, किशोर जैन, डॉ विजय नामजोशी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती हस्ती पब्लिक स्कूलचे चेअरमन कैलास जैन व क्रीडा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आनंद पवार यांनी दिली.

क्रीडा शिक्षकांनी घडवलेल्या खेळाडूंच्या कामागिरीला गुणांकन करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक या प्रमाणे प्राप्त प्रस्तावातून पुरस्कारार्थीची निवड करण्यात येते. सन्मानपत्र, मानपत्र, ट्रॅकसुट व प्रमाणत्रपत्र देऊन गौरविण्यात येते.

हस्ती आदर्श क्रीडा शिक्षक, क्रीडा गौरव, क्रीडा संघटक व क्रीडा पत्रकारीता असे वेगवेगळे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या सोहळ्यातच हस्ती परीवाराच्या वतीने धुळे व नंदुरबार जिल्हयातील क्रीडा शिक्षकांना प्रथमतःच हस्ती जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे.

राज्य पुरस्काराचा मान हस्ती परिवारामुळे धुळे जिल्ह्यास प्रथमतःच प्राप्त झाला असल्याने या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास जैन, आनंद पवार, किशोर जैन, डी. बी. साळुंखे, राज्य युवाध्यक्ष डॉ मयुर ठाकरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, कार्याध्यक्ष पंकज पाठक, राज्य वरीष्ठ सहसचिव राजेश जाधव, विलास घोगरे, सचिव राजेंद्र कदम, डी. झेड. पाटील, मिनल वळवी, नरेंद्र मराठे, घनःशाम सानप, प्रितम टेकाडे, उमेश बेल्लाळे, दिनेश म्हाडगूत यांनी केले आहे.

” हस्ती” राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

1) गणेश माळवे – परभणी

2) मनोहर टेमकर – रायगड

3) परशराम लोंढे – सांगली

4) श्रीकांत देशमुख – अमरावती

5) श्रीमंत कोकरे – सातारा

6) सुधीर बुटे – नागपूर

7) संजय मैंद – अकोला

8) आकाश पाटील – मुंबई

9) सौ विद्यादेवी घोरपडे – अहमदनगर

10) सौ सुनिता नाईक – कोल्हापूर

11) रमेश बामणे – पुणे

11) गुणवंत बेलखेडे – ठाणे

13) सचिन सुर्यवंशी – जळगाव

14) सुनिल शिंदे – लातुर

15) दिलीप पवार – भंडारा

16) सुनील शेंडे – गोंदिया

17) आशिष कान्हेड – औरंगाबाद

18) राजेश शाह – नंदुरबार

19) मनोज पाटील – धुळे

20) विक्रम सांडसे – उस्मानाबाद

21) मनोजकुमार पाटील – सोलापूर

22) सोमनाथ गोंधळी – सिंधुदुर्ग

23) कपिल ठाकुर – वर्धा

24) गिरीराज गुप्ता – यवतमाळ

25) विनोद मयेकर – रत्नागिरी

“हस्ती” राज्यस्तरीय आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार

1) अविनाश ओंबासे – ठाणे

( म. रा. क्रीडा धोरण समिती सदस्य तथा पत्रकार)

2) मिलींद पाटील – जळगाव

“हस्ती” राज्यस्तरीय आदर्श “क्रीडा संघटक” पुरस्कार

1) डी.बी. साळुंखे – धुळे “हस्ती”

राज्यस्तरीय आदर्श “क्रीडा गौरव” पुरस्कार

1) अमृत बि-हाडे – औरंगाबाद

2) शिवाजी नागरे – चंद्रपूर

3) लिलाधर बडवाईक – गडचिरोली

4) दिलीप लांडकर – बुलढाणा

5) श्यामकुमार वानखडे – वाशिम

“हस्ती” राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार – आदिवासी विभाग

1) निवृत्ती लांडगे – नाशिक

“हस्ती” राज्यस्तरीय आदर्श क्रीडा संस्था पुरस्कार

नाशिक जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्था

“हस्ती” राज्यस्तरीय आदर्श क्रीडा मंडळ ( स्पोर्ट क्लब) पुरस्कार

दि ॲक्वेटिक स्पोर्ट क्लब ऑफ सोलापूर

 

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button