जिल्हा हादरला: भावजयीवर गोळीबार करून दीर पसार

अहमदनगर- दिराने भावजयीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज घडली. सुनीता संजय भालेराव (वय 32) असे महिलेचे नाव असून त्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान घटना घडल्यानंतर गोळीबार करणारा दीर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
घटनेची माहिती समजताच शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
विशाल सुनील भालेराव हा महिलेचा दिर आहे. विशाल भालेराव याने बाहेरून गावठी कट्टा आणत भावजयी सुनीता भालेराव यांना दाखवला. हा गावठी कट्टा दाखवण्याच्या नादात त्याच्याकडून घोड्याचा खटका ओडला गेला आणि सुनीता भालेराव यांच्या डोक्यात गोळी आरपार घुसली. प्रत्यक्षदर्शी कुटुंबातील सदस्यांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताला आधी खासगी रुग्णालयात नंतर शिर्डी व नंतर लोणीला हलवले. गोळीबारात सुनीता या गंभीर जखमी झाल्या आहेत.