लेटेस्ट

Diwali bank holidays 2021 : या दिवाळी बँक असेल इतक्या दिवशी बंद !

यंदाच्या दिवाळीत केवळ दाेनच दिवस बँका सलग बंद राहणार आहेत. मात्र, असे असले तरी क्लिअरिंगचे व्यवहार मात्र दरराेज सुरू राहणार आहेत. या मुळे व्यवसायिक, नोकरदारांना आता पैसे काढण्यासह व्यव्हारासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

गुरुवार ४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन, शुक्रवार ५ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा अशी दाेन दिवस बँकांना सुटी आहे. ६ नाेव्हेंबरला महिन्यातील पहिला शनिवार असल्याने बँका सुरू राहतील. तर ७ नाेव्हेंबरला रविवारची सुटी असेल.

बँकांना केवळ दाेनच दिवस सलग सुटी असल्याने ग्राहकांची गैरसाेय हाेणार नाही. बाजारातील अर्थचक्राची गतीही कायम राहणार अाहे. वर्षातील सर्वात माेठा सण म्हणून दिवाळी साजरी हाेते.

मांगल्याचा, चैतन्याचा हा सण असून दिवाळीच्या अगाेदर आणि नंतर असे जवळपास पंधरा दिवस बाजारपेठा अाेसंडून वाहतात. माेठ्या प्रमाणावर पैसा बाजारात खेळत असताे. त्यामुळे बँकांचे व्यवहार वाढतात. दिवाळीतील बँकांच्या सुट्या बघून अनेकांना नियाेजन करावे लागते.

गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन व्यवहाराचे पर्याय उपलब्ध
एका बाजूला बँकांच्या वेळापत्रकावर व्यावसायिक, व्यापाऱ्यांना अवलंबून रहावे लागत असले तरी ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज आता फारसी उरलेली नाही.

ऑनलाइन बँकिंग, आरटीजीएस, आयएमपीएससारखे व्यवहार आता माेबाइलवरूनही होत आहेत. शाॅपिंग केल्यानंतर क्रेडिट, डेबिट कार्ड, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन App यावरून काही सेकंदात बिल देणे साेपे बनले आहे.

राेख रकमेकरिता एटीएमचे विस्तृत जाळे आहे. दिवाळीत हाेणारी गर्दी लक्षात घेऊन बँकांची ज्येष्ठांसाठी मदत कक्ष सुरू करण्याती तयारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button