Saturday, May 25, 2024
Homeअहमदनगरराममंदिर उभारण्यात शिवसेनेचा हातभार आहे, हे विसरू नका - उद्धव ठाकरे

राममंदिर उभारण्यात शिवसेनेचा हातभार आहे, हे विसरू नका – उद्धव ठाकरे

रायगड जिल्हा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. येथूनच त्यांनी जुलमी राजवटीविरोधात लढा सुरू केला. आज देशात तशीच हुकूमशाही सुरू आहे. ही हुकूमशाही नष्ट करा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेण येथे केले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची रायगड जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेची सुरुवात पेण येथून झाली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना तो महिला,

गरीब, तरुण, शेतकरी या चार वर्गासाठी असल्याचे सांगितले. मात्र, निवडणुका जवळ आल्याने १० वर्षांत पहिल्यांदाच मोदींना या वर्गाची आठवण झाल्याची टीका ठाकरे यांनी केली.

तसेच मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याची टीका करताना १० वर्षांत मांडलेल्या अर्थसंकल्पाचा आढावा घ्या. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना निकषाच्या पुढे जाऊन मदत केली.

रायगडावर निसर्ग व तोक्ते चक्रीवादळ असे नैसर्गिक संकट आले असताना पंतप्रधान इकडे फिरकले नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली.

तर राममंदिर उभारण्यात शिवसेनेचा हातभार आहे, हे विसरू नका, असे सांगून आज शेतकरी वर्ग सुखी नाही. अदानी म्हणजे देश नाही.

हे सरकार म्हणजे जादूचे प्रयोग करणारे सरकार असून, आता यांना हटवायची वेळ आली आहे. त्याची सुरुवात करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात झालेल्या या सभेला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, आ. संजय पोतनीस, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे आदी उपस्थित होते.

आता थेट लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार

विचारशून्य पक्ष देशात दहा वर्ष राज्य करतोय, त्याची लाज वाटतेय. आता लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे तळागाळात नव्हे तर थेट कळसालाच हात घालायचा. ज्यांनी शिवरायांच्या पवित्र भगव्यात छेद द्यायचा प्रयत्न केलाय,

भगव्याला कलंक लावलाय, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा काय आहे ते लाल किल्ल्यावर फडकवून दाखवूच, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी अलिबाग तालुक्यातील चौल येथे केली.

निवडून आलेला खासदार मोदी लाटेत वाहून गेला

रायगड जिल्हा मागील निवडणुकीतदेखील मोदी लाटेत वाहून गेला नव्हता, मात्र त्यानंतर निवडून आलेला खासदार मोदी लाटेत वाहून गेला.

आगामी निवडणुकीत हुकूमशाहीविरोधात सुनामी येईल, असा विश्वास व्यक्त करून रायगडमधील गद्दारांना जनता निश्चित गाडणार.

जनता एकवटते तेव्हा हुकूमशाहीला गाडल्याशिवाय राहत नाही. ही लढाई लोकशाहीविरोधात हुकूमशाही अशी आहे. भाजपने पहिल्यांदा घराणेशाही बंद करावी, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments