Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरडॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २० ला भूमीपूजन - आ. संग्राम जगताप

डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे २० ला भूमीपूजन – आ. संग्राम जगताप

Ahmednagar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समितीच्या वतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मनपाच्या माध्यमातून मार्केट यार्ड प्रवेशद्वारा समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन २० जानेवारी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार होणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कृती समितीचे नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ, प्रदीप पठारे, माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम,

इंजि. श्रीकांत निंबाळकर, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे, सुनील क्षेत्रे, विजय भांबळ, किरण दाभाडे, संजय जगताप, पोपट जाधव, कौशल गायकवाड, बंडू आव्हाड, अशोक खंडागळे, संजय कांबळे, सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

आ. जगताप पुढे बोलताना म्हणाले की, शहरात उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचे काम होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली आहे, त्यांचे विचार समाजासमोर यावे यासाठी त्यांचा नगर शहरात भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे,

माजी नगराध्यक्ष अरुणकाका जगताप हे नगराध्यक्ष असताना शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण केले, मागील काळात त्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांच्या तक्रारीमुळे ते काम मार्गी लागले नाही.

आता स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल, विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे.

त्याच धर्तीवर महापालिकेत भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे, हा पुतळा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असल्यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांना पाहायला मिळत आहे.

त्यामुळे आपल्या शहराचे नावलौकिक होत आहे, लवकरच छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात येणार आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments