Dryer Hanger : आता पावसाळयात ओले कपडे सुकवणे झाले सोप्पे, फक्त 549 रुपयांचे ‘हे’ उपकरण आणा घरी
पावसाळा सुरु झाला आहे. अशा वेळी पावसाळयात ओले कपडे सुकवणे खूप अवघड होत असते. मात्र तुम्ही 549 रुपयांचे हे उपकरण आणून तुमचे हे काम सोप्पे करू शकता.

Dryer Hanger : पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात सतत ढगाळ वातावरण व पडणारा पाऊस यामुळे बाहेर कपडे वाळायला टाकणे अवघड होते. ज्यामुळे तुमचे कपडे पूर्णपणे वाळत नाहीत. तसेच तुमचे शूजही ओले असतील तर ते देखील लवकर वाळत नाहीत.
अशा वेळी आज आम्ही तुम्हाला एका उपकरणाबद्दल सांगणार आहे. ज्याद्वारे तुम्ही कपडे किंवा शूज लवकर सुकवू शकता. आम्ही ज्या उत्पादनाबद्दल सांगणार आहोत ते पोर्टेबल इलेक्ट्रिक क्लोथ्स ड्रायर हॅन्गर आहे. हे विजेवर चालणारे हॅन्गर गरम हवा फेकून कपडे किंवा शूज लवकर सुकवू शकतात.
तसे पाहिले तर सध्या बाजारात पण अशी अनेक उत्पादने आली आहेत, ज्यामुळे गोष्टी लवकर सुकतात.यामुळे हे उपकरण खरेदी करण्यास कोणीही संकोच करत नाही. त्यामुळे तुम्हीही या इलेक्ट्रिक उपकरणाबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Portable Electric Clothes Dryer Hanger
आम्ही ज्या उत्पादनाबद्दल बोलणार आहोत ते पोर्टेबल इलेक्ट्रिक क्लोथ्स ड्रायर हॅन्गर आहे. विजेवर चालणारे हॅन्गर गरम हवा फेकून कपडे किंवा शूज लवकर सुकवू शकतात. म्हणजे तुम्हाला सूर्यप्रकाशाचीही गरज भासणार नाही. विशेष गोष्ट म्हणजे ते वस्तूंना इजा न करता कोरडे करू शकते.
हे कसे काम करते?
हे सामान्य हॅन्गरसारखे आहे. तुम्हाला ते कुठेतरी टांगावे लागेल आणि कपडे किंवा शूज बसवावे लागतील आणि प्लग ऑन करावे लागतील. त्यानंतर ते काम सुरू होते. हा हँडर पूर्णपणे प्लास्टिकचा आहे.
पण गरम हवेने ते वितळणार नाही, कारण त्यात कडक प्लास्टिक वापरण्यात आले आहे. हे 5KG भार घेऊ शकते. मध्यभागी एक बटण आहे, ते दाबून चालू करता येते. कोरडे झाल्यावर तेच बटण दाबून बंद करता येते.
किंमत किती आहे?
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते फक्त 549 रुपये देऊन खरेदी करता येते. तुम्ही ते कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करू शकता. हे ऑफलाइन देखील खरेदी केले जाऊ शकते. त्याची किंमत 500 ते 1000 दरम्यान असेल.