अहमदनगरलेटेस्ट

कोरोनामुळे ग्रामीण भागाचे अर्थचक्र चालवणाऱ्या आठवडा बाजारांवर आली ‘संक्रात’..!

आठवडा बाजार बंदचा फटका केवळ व्यापाऱ्यांना बसला नसून ‘ भाजीपाला, कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनादेखील बसला आहे.

जे शेतकरी आपला शेतमाल स्वतः आठवडा बाजारात विकत होते त्यांना बाजार बंदमुळे मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे .

त्यामुळे आठवडे बाजार सुरू करण्याबाबत कोणीच आवाज उठवत नाही. ग्राहक, दुकानदार यांच्या घटत्या संख्येमुळे बाजारावर अवलंबून असणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दोन वर्षे कोरोनामुळे अनेक उद्योग व्यावसाय अडचणीत आले आहेत. लॉकडाऊनमुळे शहरात उद्योगधंदे ,नोकरी करणारे अनेक लोक गावाकडे आले आणि व्यवसायात गुंतले .

परंतु आठवडा बाजारावर मर्यादा आल्याने गावोगाव जाऊन व्यापार करण्यास व्यापारी प्राधान्य देत आहेत.

आठवडा बाजार मोडकळीस येण्यास कोरोना महामारी, लॉकडाऊन बरोबरच गेले अनेक दिवस लांबलेला एसटी कर्मचारी संप देखील कारणीभूत असून,

ग्रामीण भागातील बाजारात येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना एसटी हाच मुख्य आधार असल्याने या संपामुळे ग्रामीण भागातील आठवडा बाजारांवर मोठा परिणाम झाला आहे.

अशा अनेक कारणांनी सध्या आठवडे बाजारातील गर्दी ओसरली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या मंदिच्या सावटामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत.

ही परिस्थिती अशीच राहीली तर अनेक बाजार व तेथील बाजारपेठा धोक्यात येणार आहेत. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, या आशेवर व्यापारी तग धरून असून

आपली जमा पुंजी अथवा कर्जे काढून दुकान चालवत असले तरी खरेदी, विक्री ‘ महागाई, वाढता खर्च, मंदी ‘ या सर्व गोष्टींचा मेळ घालून उद्योग व्यावसाय चालवणे जिकरीचे झाले आहे.

आठवडा बाजार मोडकळीस आल्यास अनेक संसार उध्वस्त होणार आहेत. त्यामुळे बंद असलेले आठवडा बाजार सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button