अहमदनगर

उन्हाळ्यामुळे कुटुंब झोपले टेरेसवर आणि खाली चोरटयांनी घर केले साफ

घराचे कुलूप उचकवून घरा प्रवेश करत बेडरूममधील लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी ४० हजारांच्या रोकडसह नऊ तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागिने अशा ४ लाख १९ हजार २०० रुपयाच्या ऐवजाची चोरी केली असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपूर येथे घडली आहे.

दरम्यान याप्रकरणी गणेश सोपान दातीर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दातीर गावच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या शेतात राहतात. उन्हाळ्या दिवस असल्याने संपूर्ण कुटुंब हे घराच्या गच्चीवर रात्री साडेदहानंतर दरवाजाला कुलूप लावून झोपायला गेले.

चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूमध्ये असलेल्या लाकडी कपाटातील दागिन्यांच्या ऐवजासह ४० हजार रुपयांची रोकड लांबवली.

सकाळी ६ वाजता गच्चीवरून खाली आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आश्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष भोये, उपविभागीय पोलिस आधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी जावून घटनेची माहिती घेतली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button