Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरप्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पॅनल बसविण्याचा प्रयत्न : आ. कानडे

प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पॅनल बसविण्याचा प्रयत्न : आ. कानडे

Ahmednagar News : बेलापूर गाव सुंदर करण्याच्या दृष्टीने भविष्यात प्रवरा नदीकाठच्या दोन्ही बाजूला घाट करण्याचा तसेच मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पैनल बसविण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

तालुक्यातील बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे १८ कोटी रुपये खर्चाचे चौपदरीकरण करून त्यावर दीड कोटी रुपये आमदार निधीतून स्ट्रीट लाईट बसविल्याबद्दल बेलापूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आ. कानडे यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद नवले, माजी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, अजय डाकले, इस्माईल शेख व्यासपीठावर उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, गेली साडेचार वर्ष कुठल्याही भानगडीत न पडता तालुक्यात असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले.

कामांच्या बाबतीत भेदभाव केला नाही. माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा तालुक्यातील जनतेचे प्रश्न, रस्ता, विज, पाणी, महिला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात अजुन पुष्कळ कामे करावायाची आहेत.

यावेळी सचिन गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अरुण नाईक यांनी आ. कानडे यांनी त्यांच्या निधीतून बेलापूर गावात केलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली. जि.प.चे माजी सभापती शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ग्रामसभेत केलेल्या ठरावानुसार या सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे सांगून आ. कानडे यांच्या संकल्पनेतून पुणे,

मुंबई प्रमाणे बेलापूर-श्रीरामपूर रस्ता झाल्याचे नमूद करून हा रस्ता जिल्ह्याचे रोल मॉडेल ठरणार असल्याचे सांगितले. जलजीवन योजनेतील त्रुटी सांगून ही योजना कशी मार्गी लागेल, याविषयी आमदार कानडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे नवले म्हणाले.

या योजनेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी मदत केल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी सरपंच महेंद्र साळवी, इस्माईल शेख,

लहानु नागले, मोहसीन सय्यद, पत्रकार ज्ञानेश गवले, देविदास देसाई, भाजपाचे प्रफुल्ल डावरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments