अहमदनगर

हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या दोन मित्रांवर आठ जणांचा हल्ला

जेवण करून हॉटेलच्या बाहेर आलेल्या दोन युवा मित्रांवर सात ते आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, फावड्याचे दांडक्याने हल्ला केला.

अहमदनगर शहरातील नगरी व्हिलेज हॉटेलसमोर ही घटना घडली. या मारहाणीत अदित्य राजेंद्र लोणकर (वय 18 रा. बागरोजा हाडको) हा युवक जखमी झाला आहे.

रूग्णालयात उपचारादरम्यान लोणकर याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलिसांत सुरज कांबळे, अनिकेत गायकवाड, रूपेश ऊर्फ सोनू ठोकळ, सागर गायकवाड, महेश कुर्‍हे व दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अदित्य व त्यांचा मित्र यश शैलेंद्र दुबे हॉटेलमध्ये जेवण करून हॉटेलच्या बाहेर थांबले होते. त्यावेळी सात ते आठ जण तेथे आले व अदित्य व यश यांना म्हणाले,‘तुम्ही आमच्याकडे खुन्नसने का बघता’, त्यावर अदित्य व यश यांनी त्यांना समजून सांगितले

असता त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुरज कांबळे याने फावड्याच्या दांडक्याने अदित्य यांना मारहाण केली. सागर गायकवाडने रॉडने मारहाण केली.‘

पुन्हा आमच्याकडे खुन्नसने बघितले तर तुम्हाला एकेकाला तलवारीने कापून टाकू’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. झटापटीत अदित्य यांची तीन तोळ्याची चेन गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button