अहमदनगर

आठ जणांकडून सराफ व्यावसायिक दांपत्यास मारहाण

शहरातील घुमरे गल्लीमध्ये सराफ व्यावसायिक दांपत्यास आठ जणांनी मारहाण केली. त्यांचे नवीन बांधकामाचे भूमिपूजन सुरू असताना ही घटना घडली आहे.

या जागेत काम करायचे नाही, येथे यायचे नाही, असे म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

व्यावसायिक मयुर दिलीप कुलथे (वय 37 रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये महेश ज्ञानेश्वर थोरात, योगेश ज्ञानेश्वर थोरात, ज्ञानेश्वर निकम, गणेश मराठे, सचिन वाळके, कैलास निकम, राहुल पुरूषोतम गारदे, सुनील जाधव यांचा समावेश आहे.

फिर्यादी कुलथे यांची घुमरे गल्लीतील आझाद चौक येथे जागा आहे. 27 एप्रिल रोजी सकाळी कुलथे व त्यांच्या पत्नीने त्यांच्या जागेत भूमिपूजन करून त्या जागेवरील जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी काम सुरू केले.

दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जुने बांधकाम पाडत असताना आठ जण तेथे आले व शिविगाळ केली. तुम्ही या जागेवर कोणतेही काम करायचे नाही, असे म्हणून मारहाण केली.

तुम्ही जर येथे परत आले, तर तुम्हाला जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपींनी दगड फेकले. यात तेथील कर्मचारी अविनाश जंगम जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button