अहमदनगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा उडणार धुराळा !
राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा मंगळवारी (दि.३) सायंकाळी केली. यात ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Ahmednagar News : पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असताना ग्रामीण भागाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा पुढील महिन्यांत उडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा मंगळवारी (दि.३) सायंकाळी केली. यात ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी तसेच नगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचातीसह ८२ ठिकाणी पोट निवडणुकीसाठी पुढील महिन्यांत ५ नोव्हेंबर मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू पी. एस. मदान यांनी केली. निवडणूका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर होणार असून नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत.
त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर ५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या २८ निवडणूका होणार असून त्याखालोखाल शेवगाव तालुक्यातील २७, राहुरी तालुक्यातील २२ आहेत