ताज्या बातम्या

Electric Scooter : भारतात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च ! 110KM रेंजसह किंमत असेल फक्त…

इलेक्ट्रिक मोटर्सने EbluFeo इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे, जी एका चार्जवर 110 किमीची रेंज देईल. तुमच्यासाठी ही एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

Electric Scooter : भारतीय बाजारात एक नवीन शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाली आहे. ही स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असून यामध्ये ग्राहकांना 110KM रेंज मिळणार आहे.

ही स्कूटर गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने आणली आहे. याचे नाव EbluFeo इलेक्ट्रिक स्कूटर असून त्याची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यासह, कंपनीने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.

यामध्ये तुम्हाला 2.52 kWh ली-आयन बॅटरी मिळते. त्याची मोटर 110 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड आहेत – इकॉनॉमी, नॉर्मल आणि पॉवर. ही स्कूटर सिंगल चार्जवर 110 किमीची रेंज देऊ शकते. व त्याचा टॉप स्पीड 60 किमी/तास आहे.

मार्चपर्यंत 12,000 ते 15,000 स्कूटर विकण्याचे लक्ष्य

स्कूटर लाँचच्या प्रसंगी, कंपनीने सांगितले की त्यांच्या रायपूर प्लांटमध्ये दर महिन्याला सुमारे 4,000 ई-स्कूटर युनिट्स तयार करू शकतात. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हैदर खान यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीचे एकूण 12,000-15,000 युनिट्सची विक्री करण्याचे उद्दिष्ट आहे.

कंपनी मोठी गुंतवणूक करेल

याबाबत कंपनीकडून सांगण्यात आले आहे की “आम्ही आतापर्यंत या व्यवसायात सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुढील तीन वर्षांमध्ये, आम्ही नवीन उत्पादन विकास, गुणवत्ता वाढ आणि विक्री पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आणखी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहोत.

विक्रीचे जाळे विस्तारले जाईल

ब्लू फिओच्या रिलीझसह, कंपनी आता देशभरात आपल्या विक्री नेटवर्कचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. तसेच “नवीन वाहन रस्त्यावर आल्यानंतर ते प्रवासाचा पुरेपूर आनंद देईल, तसेच सप्टेंबरच्या अखेरीस आमच्याकडे 50 डीलर्स असतील. त्याचसोबत या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 100 डीलर्स असण्याचे आमचे लक्ष्य आहे. असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

नवीन ई-स्कूटर लाँच होणार आहे

दरम्यान, ते म्हणाले की कंपनी पुढील सहा महिन्यांत आणखी एक ई-स्कूटर सादर करण्याचा विचार करत आहे. ब्लू फिओवर त्यांनी सांगितले की, ई-स्कूटर एका चार्जवर 110 किलोमीटरपर्यंत धावू शकते. अशा प्रकारे तुमच्या कुटुंबासाठी ही एक उत्तम स्कूटर ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button