अहमदनगर

नोकरदार; पण सात लाखाला ऑनलाईन फसवला; कसा

अहमदनगर- अकोले तालुक्यातील संतोष नारायण वाकचौरे (वय 44 धंदा- नोकरी, रा. देवठाण रोड, अकोले) यांची तब्बल 7,19,642 रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार सुमारे एक वर्षापूर्वी घडला असून वाकचौरे यांनी काल गुरूवार (दि. 29 सप्टेंबर) नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

संतोष वाकचौरे यांना मोबाईल नंबरवरून संपर्क केलेले अंशुसिंह, चरणसिंह, जयवर्धनसिंह, प्रविण बन्सल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी वाकचौरे यांना अंशुसिंह याने मोबाईलवरून संपर्क करून डिमॅट अकाउंटचा युझर आयडी, पासवर्ड मागितला होता. चरणसिंह याने शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.

 

जयवर्धनसिंह याने केदार फायनान्शियल सर्व्हिसेस लि. या कंपनीचा मॅनेजर बोलतो, असे खोटे सांगून सिंगापुर एक्सचेंजमधील गुंतवणूक केलेल्या रकमेचा नफा पाहिजे असल्यास फॉरेन्स करन्सी टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले होते. तर प्रविण बन्सल याने डिमॅट अकाउंटमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेण्यासाठी अधिक रक्कम भरण्यास भाग पाडले.

 

अशा प्रकारे वेगवेगळे आमिष दाखवून संतोष वाकचौरे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या खात्यातील पैसे ऑनलाईन काढून घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button