अहमदनगर

अतिक्रमणाने घेतला तरूणाचा बळी; टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू

अहमदनगर- श्रीरामपूर शहरातील संगमनेररोडवरील नगर परिषदेच्या बंद पडलेल्या नाक्यासमोर रस्त्यावर थांबलेल्या वाहन चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने त्या दरवाजाच्या धक्का लागून फोटोग्राफर तरुण रस्त्यावर पडला. पाठिमागून येणार्‍या दुधाच्या टँकरच्या चाकाखाली आल्याने त्या फोटोग्राफर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संतोष दत्तात्रय राजगुरु (वय 23) असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुन्हा एकदा या रस्त्यावरील अतिक्रमणाने बळी घेतल्याने प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त केला जात आहे.

 

श्रीरामपूर शहरातील संगमनेररोडवरील नगर परिषदेच्या बंद पडलेल्या नाक्यासमोर रस्त्यावर थांबलेल्या एमएच 19 एस 4432 या क्रमांकाच्या महिंद्रा पीकअप चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने पाठिमागून दुचाकीवरून येत असलेला संतोष दत्तात्रय राजगुरु (वय 23) हा तरुण दरवाजाच्या धक्क्याने रस्त्यावर पडला. त्या दरम्यान पाठिमागून येत असलेल्या एमएच 17 बीवाय 7131 क्रमांकाच्या दुधाच्या टँकरच्या मागील चाकाखाली सापडल्याने संतोष दत्तात्रय राजगुरू याचा जागीच मृत्यू झाला.

 

त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेची माहिती पोलिसांना तातडीने देण्यात आली. त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. वांढेकर, लाला पटेल, पोलीस नाईक राशिनकर, यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवून दुधाचा टँकर ताब्यात घेतला. तसेच तेथे पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

 

सदरचा आपघात हा संगमनेर रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमामुळे झाला असून. अतिशय वर्दळीचा हा रस्ता असतांना देखील. सदर रस्त्यावरील अनेक व्यापारी तसेच गॅरेज व्यावसायिकांनी, आपले दुकाने 10 ते 15 फूट पुढे आणल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक हे रस्त्यावर गाड्या लावत असतात. तसेच प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्याही रस्त्यावर तासन तासन अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. यापूर्वी देखील अनेक अपघात होऊन.

 

अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरी देखील याची कोणत्याही प्रकारची दाखल प्रशासनने न घेतल्याने. संतोष राजगुरू याला आपले प्राण गमवावे लागले. अनेकांने प्राण जात असतानाही नगरपालिका अजूनही शांतच आहे. शहरातील अनेक अतिक्रमणे काढा असे सांगितल्यानंतरही दोन दिवस थातुरमातुर कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे जैसे थे !

Related Articles

Leave a Reply

Back to top button