माजी सरपंच फसले ! एक मोबाईल आणि बँक खाते रिकामे
माजी सरपंच ते अॅप डाऊनलोड करतात आणि क्षणात त्यांचे बँक खाते रिकामे होते. ही घटना आहे जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील. याप्रकरणी नगर येथील सायबर पोलिस ठाण्यात बोर्ले गावचे माजी सरपंच भारत नारायण काकडे (वय ५९) यांनी फिर्याद दिली आहे.

महावितरण कार्यालयातून बोलत आहे. तुमचे वीजबिल अपडेट झालेले नाही. ते करण्यासाठी मोबाइलमध्ये ‘क्विक सपोर्ट’ नावाचे ॲप डाऊनलोड करा, असे सांगणारा एक फोन येतो.
माजी सरपंच ते अॅप डाऊनलोड करतात आणि क्षणात त्यांचे बँक खाते रिकामे होते. ही घटना आहे जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील. याप्रकरणी नगर येथील सायबर पोलिस ठाण्यात बोर्ले गावचे माजी सरपंच भारत नारायण काकडे (वय ५९) यांनी फिर्याद दिली आहे.
आपली ५ लाख ३४ हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भारत काकडे यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
अज्ञात व्यक्तीने त्याच्या ९८८३९७४६७९ या मोबाइलवरून फोन करत आपण ‘महावितरणमधून बोलत आहोत. तुमचे लाइट बिल सिस्टिममध्ये अपडेट झालेले नाही.
ते अपडेट करून घेण्यासाठी क्विक सपोर्ट नावाचे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करा. फिर्यादीने ते अॅप डाऊनलोड यांच्या मोबाइलचा अॅक्सेस घेत त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ५ लाख ३४ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाइन काढून घेतली.
ही बाब काकडे यांच्या लवकर लक्षात आली नाही. जेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली आहे, असे समजले तेव्हा त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली.
मात्र फसवणूक झालेली रक्कम पाच लाखांपेक्षा जास्त असल्याने जामखेड पोलिसांनी त्यांना नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (दि. २९) दुपारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे .